माझी बहिण निबंध My Sister Essay in Marathi

माझी बहिण निबंध My Sister Essay in Marathi: माझ्या बहिणीचे नाव आशा आहे. ती माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. आम्ही एकाच शाळेत शिक्षण घेत आहोत. आम्ही दिवसभरातील खूप जास्त वेळ हा सोबतच घालवत असतो. आमचे मित्र काळू आणि शेरू यांच्यासोबत शाळा सुटल्यानंतर सोबत खेळतो. सायंकाळी सोबतच आम्ही अभ्यासाला बसतो. ती अभ्यासात चांगली आहे. ती सुंदर अशी चित्रे काढू शकते. घरी असलेल्या वस्तूंपासून सुंदर अशी कलाकुसर बनव्यात ती उत्कृष्ठ आहे. मागच्याच आठवड्यात घरात पडलेल्या एका बॉटल मधून तिने सुंदर अशी फुलदाणी बनविली होती. तिला मृदू संगीत ऐकायला आणि शिकण्यासाठी देखील आवडते.

माझी बहिण निबंध My Sister Essay in Marathi

घरात तिचा पुस्तकांचा मोठा संग्रह आहे. आमच्या शाळेच्या ग्रंथालयातून सुद्धा ती वाचण्यासाठी पुस्तके घेते. एनिड ब्लेटन यांची द फेमस फाईव्ह ही मालिका तिची आवडीची आहे. कार्टून शो मध्ये तिला टॉम अँड जेरी व लूनी ट्यूनस हे खूप आवडतात. माझी बहिण ही एक सुंदर व्यक्ती आहे. म्हणी प्रमाणे तिचे हृदय खूप मोठे आहे. सभोवताली असलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी ती कायम तयार असते. ती गरीब लोकांसाठी खूप दयाळू भाव ठेवते. गेल्या आठवड्यात तिने एका गरीब आणि वृद्ध व्यक्तीला जेवण दिले. व्यक्ती घरातील असो किंवा घराबाहेरील, प्रत्येकासाठी तिचा मदतीचा हात तत्पर असतो.

प्राण्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या बाबतीत ती दयाळू आहे. माझी बहिण म्हणते की आपण प्राण्यांना मदत केली पाहिजे कारण ते बोलू शकत नाहीत आणि गरजेनुसार ते कोणाला मदत देखील मागू शकत नाहीत. फक्त वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचा नव्हे तर लहान व्यक्तींचा देखील माझी बहीण आदर करते. सहनशीलता हा तिच्यातील आणखी एक गुण आहे. मला जर एकदा काही सांगितलेले समजले नाही तर ती न रागावता अगदी शांततेत मला समजावून सांगते. जबाबदारी हाताळण्यासाठी ती सक्षम आहे. घरात सकारात्मक वातावरण निर्मिती ती करते आणि त्यामुळेच ती सर्वांना आवडते. ती स्वतः सुद्धा सतत चैतन्य शिल आणि आनंदी असते.

माझी बहिण ही माझ्यासाठी मार्गदर्शक आहे. मला जेव्हा कधी गरज असते तेव्हा ती मला सल्ला देते. माझे चुकत असेल तर मला नम्रपणे समजावून देखील सांगते. तिची सर्व गोष्टी अगदी सुस्थितीत आणि व्यवस्थित ठेवण्याची सवय मला आवडते. तिच्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये अगदी पेन पेन्सिल पासून ते कपडे पुस्तके देखील अगदी व्यवस्थित ठेवलेल्या असतात. एक छोटेसे चॉकलेट देखील असेल तरी सुद्धा ती ते माझ्यासोबत वाटून घेते.

माझ्या बहिणी मध्ये असलेला आणखी एक गुण म्हणजे ती कुठल्याही गोष्टीविषयी तक्रार करत नाही. उलट ती त्यासाठी उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असते. मला माझ्या प्रत्येक संघर्ष काळात असलेला पाठिंबा म्हणजे माझी बहिण आहे. ती माझी एक चांगली मैत्रीण आहे. मी माझ्या बहिणीवर खूप जास्त प्रेम करतो.